सामान्य रुग्णालय उदगीर येथे जनजीवनणी प्रतिष्ठानच्या मोफत थंड पाणी वाटप

उदगीर (प्रतिनिधी) जनजीवणी प्रतिष्ठाणच्या वतीने उन्हाळ्यात सामान्य रुणालय उदगीर येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी थंड पाण्याची मोफत सोय व्हावी, म्हणून जलदात्यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी दररोज 25 ते 27 पाण्याच्या कॅनची दोन महिन्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.याही वर्षी सामान्य रुग्णालय येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सामान्य रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटर येथील ओपीडी विभागत मोफत थंड पाणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरलिंग मठाचे मठाधिश सुखदेव स्वामी महाराज व उद्घाटक दिलीप गाडे पोलिस निरीक्षक उदगीर शहर हे होते तर प्रमुख पाहुणे उद्धव हैबतपूरे महाराज, सामान्य रुग्णालयाचे डॉ. शशिकांत देशपांडे, मातृभूमी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सतिश उस्तुरे , चंद्रचकोर कारखाने , डॉ. नागेश स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी जनजीवनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
डॉ. शशिकांत देशपांडे यांनी मत व्यक्त करताना म्हणाले कि, जनजीवनी प्रतिष्ठनच्या वतीने गेल्या वर्षीही सामान्य रुग्णालय येथील रुग्णांच्या नातेवाइक व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळ्यात पिण्यासाठी थंड पाण्याची मोफत व्यवस्था केली होती. याही वर्षी पुढाकार घेतला . सामान्य रुग्नालयात सर्व सुविधा उपलब्ध असून सर्वप्रकारच्या आजाराचे निदान मोफत केले जाते, याचा सर्वसामान्यां नी लाभ घ्यावा. असे आवाहन केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिष्ठानचे सहसचिव महादेव घोणे यांनी केले.
यावेळी जनजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष ॲड. दयानंद उदबाळे, सचिव ॲड .शिवाजी बिरादार, कोषाध्यक्ष डॉ.प्रशांत राजूरकर, योगेश चिद्रेवार, श्रीपाद सिमंतकर,श्रीपाद करंजीकर, आनंद महामुनी, मोतीलाल डोईजोडे, विश्वनाथ गायकवाड, दिनेश देशमुख, प्रा. गोविंद इंगळे, प्रमोद जोशी आदी उपस्थित होते .