सैनिकी विद्यालयाचा बारावी विज्ञानचा १०० टक्के निकाल

उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला .
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे एकुण ६५ विद्यार्थी बारावी विज्ञान परीक्षेसाठी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे सैनिकी विद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे.
विद्यालयातील ए तुकडीतील हनमंत भंडे व साईनाथ येलाले प्रथम 69 टक्के, दीपक माने द्वितीय 68 टक्के, अनिकेत राठोड 65 टक्के तृतीय तर बी तुकडीतून संकेत केसोड प्रथम 64 टक्के , पवन रोंटेवाड द्वितीय 63 टक्के तर अविनाश गोपोड तृतीय 62 टक्के गुण घेऊन तर उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सैनिकी विद्यालयात एनडीए, जेईई, नीट, स्पर्धा परीक्षा याची तयारी करुन घेतली जाते. अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत, भारतीय संरक्षण दलात, शिक्षण क्षेत्रात, अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत.
इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, प्रा. नितीन पाटील, प्रा. सीमा मेहत्रे, प्रा. युवराज दहिफळे, प्रा. शिवाण्णा गंदगे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म. पाटील , उपाध्यक्ष चंदन पाटील, प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.