टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करा, बहुजन विकास अभियानाची मागणी……..

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावासाठी वॉटर ग्रीड आणि केंद्र शसनाची जलजीवन मिशन योजना लागू झाल्याने आणि यापैकी काही गावातून योजना पूर्ण झाल्याचे दाखवत, दलाल आणि गुत्तेदारांनी पैसे लाटले आहेत. बोगस कामे, अर्धवट कामे यामुळे आता त्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तिथे तांत्रिकदृष्ट्या पर्यायी व्यवस्था देता येत नाही. ही मजेशीर बाब म्हणजे “बाप भीक मागू देत नाही, आणि आई जेवायला वाढत नाही”अशी झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि नागरिकांचा रेटा वाढत चाललेला पाहून उपविभागीय अधिकारी यांनी काही वाडी तांड्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून टँकर सुरू केले आहेत. मात्र टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू असून शासकीय यंत्रणा दखील कात्रीत सापडली आहे, असे चित्र आहे.
पाणीटंचाईचे गंभीर चित्र पाहून येत्या चार ते पाच दिवसांमध्ये जर संबंधित प्रशासनाने उदगीर आणि जळकोट मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा नाही केल्यास, बहुजन विकास अभियानच्या वतीने गुराढोरासह पंचायत समिती कार्यालयासमोर वऱ्हाड सत्याग्रह करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण भागातील वाड्यात, तांड्यात खेड्यातील नागरिक एक माठ पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे. प्रसिद्धी माध्यमाने सर्वकाही व्यथा माध्यमातून शासनाने प्रशासनाच्या समोर दाखवून देखील, संबंधित विभागाचे अधिकारी जर झोपेचे सोंग घेत आहेत. बहुजन विकास अभियान आता आंदोलन केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिलेला आहे. यावेळी मानसिंग पवार, शिवाजी मामा करक्याळे, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, अक्षय सावंत, सुनील पाटील, गंगाधर शेवाळे, प्रकाश कांबळे, रवी पुदाले, सागरभाई लोणीकर, चंद्रकला वाघमारे, सुरेशीला पाटील, राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते.