हेर येथे सस्ती आदालत कार्यक्रमात: शिवरस्ता व पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर ६१ तक्रार अर्ज सादर. १९ अर्ज निकाली काढण्यात आले.

0
हेर येथे सस्ती आदालत कार्यक्रमात: शिवरस्ता व पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर ६१ तक्रार अर्ज सादर. १९ अर्ज निकाली काढण्यात आले.

हेर (प्रतिनिधी):- उदगीर तालुक्यातील हेर येथे वाघोबा मंदिर सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या सस्ती आदालत कार्यक्रमात ६१ शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे शिवरस्ता व पाणंद रस्त्यांबाबत तक्रार अर्ज सादर करून आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांनी गावशिवारातील रस्त्यांची दयनीय अवस्था, शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी होत असलेल्या अडचणी आणि नादुरुस्त पाणंद रस्त्यांमुळे शेती व्यवसायास होणाऱ्या अडथळ्यां विषयी सखोल माहिती दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका अविनाश सूर्यवंशी या होत्या.
या वेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, तसेच गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर , उपाधीक्षक भूमि अभिलेख किशोरकुमार कोरे, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता उगीले, पोलीस पाटील एकनाथ कसबे, मंडळ अधिकारी पंडित जाधव, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव मुसळे, ग्राम महसूल अधिकारी सावन उळागड्डे, अनुराधा अलगुले, संतोष पाटील, अंकुश वडगावे, लिपिक संभाजी सुडे,भुमापक संजय जाधव, उपसरपंच तुळशीराम बेंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे यांच्या सह हेर महसूल मंडळातील करडखेल,वायगाव, कुमठा खुर्द , डिग्रस , गणेशवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी शेतकऱ्यांना अश्वस्त केले की संबंधित विभागांमार्फत लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पुढाकार घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ सुरू करण्याची सूचना केली.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. सस्ती आदालत कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळत असून, शासन योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत आहे, असे मतही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले, सुत्र संचालन ग्रामपंचायत लिपिक विलास कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी संतोष पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!