उदगीर शहरात वासवी माता जयंती अति उत्साहात साजरी

उदगीर (प्रतिनिधी)
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभा उदगीर तर्फे उदगीर शहरात वासवी माता जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली .सकाळी वासवी मातेचा महाअभिषेक सौ. स्वाती धनंजय देबडवार व सौ. स्वाती मनोज कोटलवार यांच्या हस्ते करण्यात आला . वासवी मातेला 56 भोग करण्यात आले, तसेच वासवी मातेस चांदी व सोन्याचा कंबर पट्टा करण्यात आला. त्यानंतर अकरा वाजता महाआरती झाली. उदगीर शहरातील सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मनोज कोटलवार व रवींद्र मलगे यांचे कडून करण्यात आली होती. तसेच सुयोग कोटलवार व पिंटू मद्रेवार यांनी महाप्रसादाचे काम पाहिले. हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वासवी मातेच्या जयंतीची सर्व नियोजन आर्य वैश्य महिला महासभा उदगीर तसेच आर्य वैश्य समज उदगीर यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा सौ. सुजाताताई पंदीलवार तसेच आर्य वैश्य महिला महासभेच्या सचिव सौ. राधिका वट्टमवार, उपाध्यक्ष सौ. स्वाती देबडवार तसेच सौ. रंजीता मुर्के, सौ. सपना गादेवार, सौ. मृदुला चिद्रेवार, सौ. मनीषा पारसेवार, सौ. स्मिता मुक्कावार, सौ. सारिका वट्टमवार व आर्यवैश्य समाजातील सर्व महिला यांनी परिश्रम घेतले.