श्रीजा पाटील हिचा होळसमुद्र येथे सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) सीमा भागातील कमाल नगर तालुका येथील होळसमुद्र येथे हरिनाथ केशवनाथ संस्थान यांच्या वतीने श्रीजा नंदराज पाटील इयत्ता दहावी मध्ये शेवडे हायस्कूल भालकी येथून दहावी मध्ये जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे. 625 पैकी 622 गुण घेऊन बिदर जिल्ह्यातून प्रथम व राज्यातून चौथा क्रमांक पटकावलेला आहे. त्या बद्दल तिचा गुणगौरव, सत्कार मोठ्या उत्साहात होळसमुद्र येते करण्यात आला. त्या वेळी ग्रामस्थ: ज्ञानेश्वर पाटील , गोपाळराव पाटील, प्रदीप पाटील ,राहुल पाटील ,विठ्ठलराव साळुंखे, राम कदम, पांडुरंग पाटील, विजयकुमार नंदनूरे, विजयकुमार कदम, डॉ. नंदराज कदम, डॉ .सुप्रिया इत्यादी ग्रामस्थांनी मुलीचा कौतुक करून पुढील शिक्षणासाठी खूप शुभेच्छा दिल्या.