परिचारिकांचे कार्य सेवा, समर्पणाचे व समाजहिताचे – प्राचार्य उषा कुलकर्णी

उदगीर (प्रतिनिधी) परिचारिकांचे कार्य एक नौकरी नसुन सेवा समर्पणाचे व समाजहिताचे आहे. आरोग्य सेवेत परिचारिकेची महत्वाची भूमिका असल्याचे मत फ्लोरेन्स नांयटींगल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिननिम्मित्त मातृभूमी व कस्तुराबाई नर्सिंग स्कूल येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाची सुरुवात फ्लोरेन्स नायंटीगल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व मेनबत्ती पेटवून अभिवादन करुन करण्यात आले.
यावेळी प्रा .प्रतिक्षा काकडे , प्रा. मिरा पाटील, प्रा.अंकिता मर्ढे, राहूल जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्राचार्य कुलकर्णी म्हणाल्या की, परिचारिकेची भूमिका ही फक्त सांत्वनाचीच नसून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले आरोग्य सेवा देणे, समाजाला आरोग्य शिक्षण देणे, व्यक्तीचे मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजा पूर्ण करणे, रुग्णाची प्रगती करणे तसेच रुग्णाचे हित व औषध उपचार देणे, परिचारिकाना रुग्णाचे समर्थक म्हणून तसेच तज्ञ संशोधक अशा बहुआयामी भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिचारिकांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले
सूत्रसंचालन प्रा बिभिषण मद्देवाड यानी केले तर आभार ओंकारे जगदीशा यांनी मानले . यावेळी कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.