उदगीर शहरासाठी सिटी बसची व्यवस्था करण्याची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. शहर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने शहरांमध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी रिक्षाला मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. विद्यार्थी आणि गोरगरिबांना ही बाब न परवडणारी असल्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून नगर परिषदेने उदगीर शहरासाठी स्व. चंद्रशेखर भोसले यांच्या काळात ज्या पद्धतीने सिटी बस चालू होती. त्या पद्धतीने सिटी बस पूर्वत चालू करावी, अशी आग्रही मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.
उदगीर शहर हे नांदेड रोडवर तोंडार पाटी पर्यंत वाढले आहे तर बिदर रोडवर ठाकरे चौक पर्यंत वाढले आहे. उदगीर देगलूर रोडवर आयटीआय कॉलेज तसेच अवलकोंडा रोडवर म्हाडा कॉलनी पर्यंत वाढलेले आहे. नळेगाव रोडवर मलकापूरच्या विश्रामगृहापर्यंत वस्ती झालेली आहे. शहराच्या या विकासाचा विचार करून या सर्व ठिकाणी सिटी बसची व्यवस्था होने गरजेचे आहे. जनतेची गरज विचारात घेऊन तात्काळ सिटी बस चालू करण्यात यावी. जेणेकरून योग्य पैशात नागरिकांना आपला प्रवास, येणे जाणे करता येईल, विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, मजुरांना कामाला जाता येईल, म्हणून नगरपालिकेने तात्काळ सिटी बसची व्यवस्था करावी. अशी आग्रही मागणी बहुजन विकास अभियान च्या वतीने करण्यात आली आहे. जनतेसाठी आवश्यक असलेले या सुविधेकडे नजर अंदाज केल्यास नाईलाजाने बहुजन विकास अभियानला नगरपालिके समोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रसिद्धी माध्यमाला बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिला आहे.