विद्युत तक्रार गार्‍हाणे मंचच्या सदस्यपदी निवड; अ.भा.ग्राहक पंचायतीकडून भोसरेकर यांचा सत्कार

विद्युत तक्रार गार्‍हाणे मंचच्या सदस्यपदी निवड; अ.भा.ग्राहक पंचायतीकडून भोसरेकर यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : विद्युत तक्रार गार्‍हाणे मंचच्या पुणे झोन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अजय भोसरेकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्युत तक्रार गार्‍हाणे मंचचे सदस्य म्हणून भोसरेकर यांची पुणे झोनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांची सोडवणूक करणे तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताला प्रति दिवशी ६०० रुपयांपासून १ लाख रुपये दंड करण्याचे अधिकार या पदावरील व्यक्तीला असतात.या मंचचे सदस्यपद हे शासकीय पद आहे.अजय भोसरेकर हे अनेक वर्षांपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सक्रिय सदस्य आहेत. ग्राहक मंचचे अध्यक्ष म्हणून दोन टर्म अर्थात १० वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. विद्युत तक्रार गार्‍हाणे मंचच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांनी भोसरेकर यांचा सत्कार केला. पंचायतीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष जमदाडे, शहराध्यक्ष इस्माईल शेख, महिला तालुकाध्यक्षा सुरेखा स्वामी,सुजाता धर्माधिकारी, सरिता संदीकर, मुन्ना हाश्मी, अहेमद हरणमारे, गोविंद राठोड, शारदा बेद्रे यांची यावेळी उपस्थिती होती.

About The Author