उदगीरात लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधुवर परिचय मेळावा
लातूर (प्रतिनिधी) लिंगायत महासंघ शाखा उदगीर च्या वतीने रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.वाजून 30 मिनिटांनी भगीरथ मंगल कार्यालय डॅम रोड आडत लाईनच्या पाठीमागे उदगीर येथे लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या मेळाव्याला औसा हिरेमठ संस्थांचे शिवाचार्य शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, उदगीर हावगीस्वामी मठाचे श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज तसेच मुखेड येथील विरुपक्ष शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात,व शि भ प शिवराज नावंदे गुरुजी मार्गदर्शक उदगीर व माजी केंद्रीय मंत्री भगवंतराव खुबा, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार प्रकाश खंड्रे ,माजी आमदार मनोहरराव पटवारी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर चे सभापती शिवाजीराव हुडे ,नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मल्लिकार्जुन मानकरी, जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथआप्पा किडे, शंकरराव हरकरे,संग्राम हुडगे
आदी मान्यवर उपस्थित राहणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वधू वर व पालक या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
