राष्ट्रीय छात्र सेना दिन उत्साहात साजरा

0
राष्ट्रीय छात्र सेना दिन उत्साहात साजरा

उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आणि लालबहादूर शास्त्री विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे राष्ट्रीय छात्र सेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन डॉ. राम साबदे (एनसीसी कंपनी कमांडर) उपस्थित होते. शाळेचे पर्यवेक्षक किरण नेमट आणि एनसीसी अधिकारी वि. र. तेलंग व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनात एनसीसीचे युवक घडविण्यातील महत्त्व विशद केले. एनसीसी गीत व वंदे मातरम् चे सामूहिक गायन झाले. एनसीसी कॅम्प पूर्ण केलेल्या छात्र सैनिकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. विविध गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक प्रज्वल पावडे, सूत्रसंचालन हर्षद कारामुंगे व निलकृष्ण माने, आभार प्रदर्शन प्रगती निलेवाड यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!