मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी, प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन केले आहे. शोध वार्ता व उत्कृष्ट वार्ता या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मागच्या सतरा वर्षापासून मराठवाडा विभागीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असुन पुरस्काराचे हे 18 वे वर्ष आहे. उत्कृष्ट वार्ता व शोधवार्ता या दोन गटात आयोजित स्पर्धेत, दैनिकाच्या प्रतिनिधींनी 1 डिसेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नावासह प्रकाशित झालेली बातमी नावासह प्रकाशित झालेली नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मूळ प्रत आणि तीन साक्षांकित प्रत व वार्ताहरचे दोन पासपोर्ट फोटो, कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख पॉकेटवर लिहून स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका 25 डिसेंबर 2025 पर्यंत उदगीर तालुका पत्रकार संघ, द्वारा दैनिक यशवंत विभागिय कार्यालय, नगर परिषद व्यापारी संकुल, ई बिल्डिंग पहिला मजला,
उदगीर जिल्हा लातूर (पिन कोड 413517) या पत्त्यावर पाठवाव्यात. या अगोदर पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांनी परत प्रवेशिका पाठवू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पुरस्कार जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जुन मुद्दा यांच्यावतीने रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वती वतीने तीन हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कै. अनंत आपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच शोध वार्ता गटात प्रथम पारितोषिक कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जुन मुद्दा यांच्या वतीने रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक वृत्तपत्र विद्याविभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्यावतीने तीन हजार रुपये, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषक कै. व्यंकटराव कलप्पा मोगले यांच्या स्मरणार्थ रोख दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ऊत्कृष्ठ वार्ता व शोधवार्ता गटातील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील पत्रकारानी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल.पी. उगीले, स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रविण जाहूरे , बालाजी कवठेकर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!