चाकूर तहसील कार्यालयात आमदारांचा जनता दरबार, जनतेच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना
चाकूर (अहमदपूर) : येथील तहसील कार्यालय येथे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जनता दरबार घेतला व मतदार संघातील नागरीकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या तात्काळ सोडवण्याच्या सुचना करण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील नायगाव, तळघाळ, आष्टा, कवठाळी, अंबुलगा, गांजूरवाडी, बेलगाव, झरी नवकुंड, या गावच्या सिंगल फेज, थ्री फेज विजेसोबतच रोहित्र तात्काळ दुरुस्त करणे. तसेच विजेसंदर्भातील सर्व समस्या लवकर सोडविण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर महाळंग्रा येथील कबालनामाच्या प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेतील लोकांच्या पगारी लवकर करण्यात याव्यात आणि मागील प्रस्ताव मंजूर करावेत. तसेच पंचायत समिती घरकुल योजनेत घरकुल यादी संदर्भात अधिकऱ्यांना सूचना आमदार यांनी सुचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.