काही तासाच मोबाईल चोर पोलीसांच्या जाळ्यात”
लातूर (एल पी उगीले) पोलीस स्टेशन मुरूड हद्दीमध्ये दि. ०९/०६/२०२६ रोजी रात्री ०१.०० ते ०४.०० चे दरम्याण बोरगाव काळे येथील मस्जीद ए रहमत या मस्जीद मधून अब्दूल कादर बहादूर सय्यद (वय ३३ वर्षे) व त्यांचा मित्र सदर मस्जीद मध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरांनाी vivo y29 5g व i phone 11 असे दोन मोबाईल एकूण किमंत 36,000/- रूपये चोरून घेवून गेले. त्यावरून पोलीस स्टेशन मरूड येथे गु.र.न. 134/26 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद झालेला होता.पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे हे नियमीतपणे व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे सर्व जिल्हयातील गुन्हया संबधाने आढावा घेतात, त्यामध्ये चोरीचे तसेच इतर सर्व अउघड गु्न्हे तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना देवून पाठपूरावा करत असतात. आवश्यक ती तांत्रीक मदत पुरवण्या बाबत सायबर सेल यांना सुचना देतात. सदर गुन्हयामध्ये सायबर सेल लातूर यांची मदत घेवून चोरीस गेलेल्या मोबाईलचा व आरोपीचा शोध घेण्यास पोलीसांना यश आलेले आहे. सदर मोबाईल आरोपी शेरू चॉंदपाशा शेख (वय 40 वर्षे रा. अंजली नगर लातूर) यांने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गु्हयातील आरोपीकडून 36000/- रूपयाचे दोन्ही मोबाईल जप्त झाले असून इतर दोन मोबाईल किमंत 20,000/- रूपये त्याच्याकडे मिळून आलेले आहेत. सदर मोबाईल त्यांनी कुठून चोरलेले आहेत? या बाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार हे तपास करत आहेत.
