नूतन पोलीस निरीक्षक सुडके यांनी स्वीकारले शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचा पदभार

नूतन पोलीस निरीक्षक सुडके यांनी स्वीकारले शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचा पदभार

पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा निरोप समारंभ संपन्न


शिरूर अनंतपाळ ( किशोर सुरशेट्टे ) : पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारून दोन वर्ष पुर्ण झाले आहेत . या दोन वर्षांपूर्वी तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला होता मात्र पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या दोन वर्षात अवैध धंद्या विरोधात कारवाईचा बडगा उगारूण तालुक्यातील अवैध धंद्याला लगाम लावले आहेत . व कोरोना विषाणू पासून तालुक्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी शिरूर अनंतपाळ शहरासह गावागावत जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांना सोशल डिस्टंन्स पाळण्याचे सवय लावले व लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर थांबून विनाकारण फिरणाऱ्यांवर व विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करून विनाकारण फिरणाऱ्यांवर लगाम लावले , त्यामुळे तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या मंदावले आहे . व अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सामाजिक उपक्रम राबवले आहेत . पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या दोन वर्षात केलेल्या कामाचे निरोप समारंभामध्ये त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले . व शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचा पदभार नूतन पोलीस निरीक्षक सुडके यांनी स्वीकारले व पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या दोन वर्षात ज्या पद्धतीने कर्तव्य बजावले आहेत . त्याच पद्धतीने सुडके यांनी कर्तव्य बजावेन असे गवाही दिले . यावेळी पोलीस कर्मचारी , पत्रकार बंधु , पोलीस पाटील , व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!