स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने कोरोना लसीकरण
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ दिनांक 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र व भारत देशाची कोरोनातून मुक्ती होवो यासाठी.स्वराज्य गणेश मंडळ आयोजित ग्रामीण रुग्णालय व डॉ मजगे क्लिनिक यांच्या विद्यमाने 140 (एकशे चाळीस) जणांनी लसीकरण करून घेतले.ही लसीकरणाची मागणी सर्वप्रथम स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जी मजगे यांनी सार्वजनिक गणेश उत्सव च्या शांतता बैठक मधे मांडली होती.सर्व अहमदपूर मधील गणेश मंडळास लसीकरणाची सोय करून द्यावी मागणी चा प्रस्ताव मांडला होता.ती मागणी प्रशासनानी मान्य करून शहरात सर्वत्र लसीकरणाची मोफत सोय करून दिली. व त्या अनुषंगानेच आज शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी 140 जणाचे लसीकरण करून घेतले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचे बिराजदार साहेब व तसेच डॉक्टर मजगे साहेब हे होते. मंडळाचा गेली 13 वर्षाच्या सामाजिक कार्याचा आलेख संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांनी सांगितला.यावेळी या वर्षीचे अध्यक्ष गजानन सोमवंशी सर, उपाध्यक्ष विशाल राठोड, राहुल भालेराव, पंकज गंगथडे फयुम शेख,दीपक मजगे, सूनील सर देशमुख राजू जाधव नर्सिंग पामुलावार, दत्तात्रय गंगथडे, रमेश जाधव, योगेश शिवपुजे,संकेत गिरी, शिवराज चोतवे, सुरेंद्र गिरी एन डी गडवे, धनु बोराडे, महेश जाधव,देवा उराडे, विशाल भालेराव, मारुती हेमनर, बालाजी कानवटे बाळू होनाळे,, सुदर्शन हालसे, काडवादे मामा, सलीम सय्यद, ऋषी पामुलावर जगदीश कावळे, माधव लुंगारे, मेहबूब शेख, मोहित वारे, अंगदजी बालवाड. व समस्त स्वराज्य मित्रपरिवाराने कोरना नामक या भयंकर रोगांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवून .सर्व नियोजित कार्यक्रम स्वराज्य मित्रपरिवाराने यशस्वी केला व श्री गणरायास साकडे घालून कोरना या भीषण विषाणूपासून आता तरी आम्हाला लवकरात लवकर आम्हाला मुक्त कर अशी प्रार्थना केली.