संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक वर्गातून जयपदम वजीर, दासराव मोरे, राजपाल बैकरे, रेड्डी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व पालकांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी, देवेंद्र दशरथ लोहकरे, सोनल रमेश भालेराव ,सृष्टी वैजनाथ सूर्यवंशी, महेश भानुदास पस्तापुरे, श्रेया नरहरी पवार, श्रेया शिवाजी जवणे, नोमान रफिक अहमद शेख ,श्रावणी हरिदास भंडे, गार्गी चंद्रशेखर नळेगावकर, यशराज रमेश सूर्यवंशी, श्रीजल बालाजी नवलागिरे, तन्वी मनोजकुमार पस्तापुरे, संस्कृती संजय पलमटे ,नैतिक ज्ञानोबा उगिले, आरती अशोक मुंढे, प्रतिक संतोष उगिले, स्वराज अरुण तिडके, प्रांजल सचिन मुसणे, आदित्य माधव मुंढे, पृथ्वीराज परमेश्वर तिडके या विद्यार्थ्यांना संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या हस्ते ट्रॉफी व बक्षीसाचा चेक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ऑनलाइन उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले. आभार शारदा तिरूके यांनी मानले. शेवटी त्रिगुणा मोरगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.