राष्ट्रीय ‘ओझोन’ दिनानिमित्त डॉ. बळीराम पवारांकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षभेट
अहमदपूर (गोविंद काळे) : डॉ. बळीराम वसंतराव पवार यांनी राष्ट्रीय ओझोन दिनाचे निमित्त साधून येथील महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरला पर्यावरणपूरक असलेले ‘करंजी’ व ‘पिंपळ ही वृक्षरोपे भेट म्हणून दिले. मराठी समाजशास्त्र परिषदेचे कोषाध्यक्ष तथा महात्मा फुले महाविद्यालय किनगावचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बळीराम पवार यांनी अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयास घनगर्द सावली व शुद्धहवा देणारे ‘करंजी’चे व ‘पिंपळ’ वृक्ष भेट देऊन ते स्वतः व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ.अनिल मुंढे, डॉ.पी.डी.चिलगर, ह.भ.प. डॉ. आनिल महाराज मु़ंढे, डॉ. बी. के. मोरे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, वामनराव मलकापुरे, चंद्रकांत शिंपी आदिंसह मान्यवरांच्या हस्ते त्याचे रोपण करण्यात आले.