मधुमेह, रक्तदाब आणि सांधेदुखी तपासणी
उदगीर (प्रतिनिधी) : वडार गल्ली, उमा चौक,उदगीर येथे अष्टविनायक बाल गणेश मंडळ व मधुर डायबिटीस सुपर स्पेशलिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. विजय भैय्या निटूरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुमंगल हॉस्पिटलचे डॉ. विजय बिरादार, मधुर सुपरस्पेशालिटी चे डॉ.प्रशांत नवटके व फय्याज भाई डांगे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये डॉ.विजय बिराजदार यांनी गुडघे दुखी, पाठदुखी कसे टाळता येईल तर डॉ.नवटके यांनी मधुमेह व रक्तदाब कसे नियंत्रणात ठेवायचे यावर मार्गदर्शन केले. असेच आरोग्यदायी शिबिरे गणेश मंडळाने आयोजित करावे असे आव्हान विजयभैया यांनी केले. कार्यक्रमांमध्ये 71 रुग्णांची मधुमेहाची व रक्तदाबाची मोफत तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी ऋषिकेश पल्ले, पवन विडेगोटे, सोहन विडेगोटे, किशोर पल्ले संतोष विडेगोटे गणेश पल्ले,निलेश विडेगोटे, सद्दाम बागवान,बलभीम विडेगोटे, आकाश कंचे,राम भांजे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन सूनील जवळे यांनी केले तर मधुमेहा ची व रक्तदाबाची चाचणी सुनील पाटील, केशव बिरादार यांनी केले.