पोलिसांतर्फे सजग रिक्षा चालकाचा सत्कार

पोलिसांतर्फे सजग रिक्षा चालकाचा सत्कार

पुणे (केशव नवले) : पुणे रेल्वे स्थानकावरून काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा अमानुष प्रकार केला. मात्र त्याच वेळी पुणे स्टेशन येथील एसटी स्टँड वर रिक्षा व्यवसाय करणारे  रिक्षा चालक अब्दुल आत्तार व त्याच भागात अंडाभुर्जी चा व्यवसाय करणारे एक व्यवसायिक यांनी देवदूतासारखे धावत येऊन त्या सहा वर्षाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या रिक्षाचालकाला पाहिले व घटनेची गांभीर्य ओळखत त्या रिक्षाचा दुसऱ्या बाजूने पाठलाग केला. मात्र चौकात वळसा घालून तो  रिक्षा चालक फरार झाला होता. रिक्षाचालक अब्दुल आत्तार याने ही बाब लगेच पोलिसांना सांगितल्याने ती सहा वर्षाची मुलगी व पळवून नेणारा रिक्षाचालक यांना पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. 

बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गवारी साहेब तसेच सहाय्यक आयुक्त श्री. सांगळे साहेब यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे रिक्षाचालक अब्दुल आत्तार व अंडा भुर्जी चा व्यवसाय करणारे व्यवसायिक यांचा श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी रिक्षाचालक अब्दुल आत्तार यांची प्रशंसा केली व अशा प्रामाणिक व सजग रिक्षा चालकांमुळेच रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारण्यास मदत होत असते. तरी रिक्षाचालकांनी असा कोणताही प्रकार लक्षात आल्यास लगेच पोलिसांना संपर्क करून माहिती द्यावी. जेणेकरून अशा घटनांवर आळा बसू शकेल असे म्हणाले.

 बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे पोलिसांतर्फे सत्कार समारंभ साठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल तसेच उपाध्यक्ष अरशद अन्सारी व पदाधिकारी किरण एरंडे,अन्सार शेख व कला व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रमुख अध्यक्ष मुराद भाई काजी आदी उपस्थित होते.

About The Author