लातूर मिशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार अमित तिकटे यांना
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दैनिक लातूर मिशन या वृत्तपत्राने आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवदर्शन फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील आदर्श आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये लातूर येथील पोलीस फ्लॅश न्यूज वेब पोर्टल चॅनलचे उपसंपादक अमित तिकटे यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे! महापौर विक्रांत गोजमगुंडे! ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये संयोजक भरत जाधव लातूर मिशन चे मुख्य संपादक आणि संस्थापक अध्यक्ष शिवदर्शन फाउंडेशन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प रामायणाचार्य प्रशांत महाराज खानापूरकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
अमित तिकटे हे मेहनती आणि कष्टाळू असून त्यांच्या प्रयत्नातून पोलीस फ्लॅश न्यूज वेब पोर्टल चॅनल महाराष्ट्रामध्ये आज गाजत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी लातूर मिशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती लातूर मिशन चे मुख्य संपादक भारत जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.