भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या तर्फे सेनेच्या नुतन पदाधिऱ्यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शासकीय विश्रामग्रहामध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या तर्फे सेनेच्या नुतन पदाधिऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या विषयीची सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील शिवसेचे कट्टर समर्थक भारत सांगवीकर व लक्ष्मण अलगुले यांच्या कार्यामुळे अहमदपूर शहरात केलेल्या वेगवेगळ्या कार्याची दखल घेऊन शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी भारत सांगवीकर तर अहमदपूर शहर प्रमुख पदी लक्ष्मण अलगुले यांची निवड करण्यात आली होती. या निवडीबद्दल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत सरकार रेल्वे मंत्रालय सल्लागार धनराज गुट्टे, डॉ सिर्द्धाथकुमार सूर्यवंशी, राजु खंदाडे, राम गंगथडे, युवासेना तालुका प्रमुख रामप्रसाद आय्या, गजानण मुंढे, वैभव बलोरे, विष्णु पोळ हे उपस्थीत होते.