डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क अंदोलनात आंबेडकरी जनतेचे यश
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण आणि छत्रपती शाहू महाराज पुतळा या प्रश्नासंदर्भात बहिष्कृत हितकारणी संघर्ष समिती लातूर च्या वतीने दिनांक 6 डिसेंबर 2021 या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आरंभलेले बेमुदत आमरण उपोषण दि 9 डिसेंबर अर्थात चौथ्या दिवशी मनपा प्रशासनाकडून आलेल्या लेखी पत्रामुळे संपुष्टात आले. या पत्रानुसार आंबेडकर पार्क ची संपूर्ण जागा मोजून त्यावर कुठलेही व्यावसायिक बांधकाम येथे केले जाणार नाही असा ठराव येणाऱ्या मनपा सर्वसाधारण सभेत घेतला जाईल तसेच शाहू पुतळ्यासंबंद्धी प्रलंबित परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर घेऊन पूर्णाकृती पुतळा बसवला जाईल. तरी उपोषणकर्ते निखिल गायकवाड, महेश गुंड, निलेश सिरसाट, संदेश अण्णा शिंदे, चिंटू गायकवाड, अक्षय धावारे, बबलू गवळे, बाबा ढगे, कार्तिक गायकवाड, बापू शेळके यांनी मनपा उपायुक्त शिवाजी गवळी यांच्या उपस्थितीत आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विनोद खटके, लाला सुरवसे, चंद्रकांत चिकटे, हनुमंत जागते, डॉ.सिद्धार्थ सूर्यवंशी, मनपा कर्मचारी पिडगे साहेब, यांच्या विशेष प्रयत्नातून उपोषण समाप्त केले. मनपा प्रशासन पदाधिकारी यांच्याकडून या प्रश्नासंदर्भात चालढकल झाल्यास भैया वाघमारे, मंगेश सोनकांबळे, राहुल कांबळे, सचिन लामतुरे, आकाश इंगळे, सचिन गायकवाड, सतीश करांडे, सुरज शिंदे यांनी बहिष्कृत हितकारिणी समितीच्या वतीने भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.