आ.धीरज देशमुख यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट

आ.धीरज देशमुख यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : भारताचे भूतपूर्व केंद्रिय गृहमंत्री तथा पंजाब चे माजी राज्यपाल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननिय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या लातूर येथील देवघर येथील निवासस्थानी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी भेट घेवून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांचा सत्कार केला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी विविध विषयांवर चाकूरकर साहेब यांनी आमदार धीरज देशमुख यांच्या सोबत चर्चा केली तसेच जिल्हा बँकेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, ट्वेण्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अनुप शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!