दयानंद कला महाविद्यालयात ‘’ पटकथा लेखन’’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयामधील ॲनीमेशन विभागाच्या वतीने पटकथा लेखन या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेमा तज्ञ व समिक्षक डॉ.संतोष पाठारे, सचिव प्रभात चित्र मंडळ, मुंबई हे लाभले.
या वेळी कार्यशाळेमध्ये लघु चित्रपट दाखवुन पटकथा लेखन कसे करावे पटकथेची मांडणी कशी करावी त्या साठी कुठल्या बाबींचा अभ्यास केला पाहिजे तसेच पटकथा लेखन प्रभावी करण्यासाठी कोणत्या पैलू ची जाण असणे आवश्यक आहे. एखादी संकल्पना सुचल्यानंतर पटलेखनाद्वारे एका चित्रपटामध्ये त्यास कसे उतरवतात हे खुप आवश्यक आहे अशा नाना विविध पैलुंवर प्रकाश पाठारे यांनी टाकला. चित्रपट समाजात घडणा-या घटनांचे प्रतिबिंब असतो. तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम चित्रपट करू शकतो. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
प्रास्ताविकामध्ये प्रा.दुर्गा शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी शॉर्ट फिल्म असो वा सिनेमा पाहताना फक्त् नायक नायिका न बघता कथा पटकथा काय असते हे समजुन घेण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक फिल्मचा खरा नायक हि त्याची पटकथा असते. असे प्रतिपादन केले. व जागतिक पातळीचे सिनेमा तज्ञ व समिक्षक आपल्या समवेत आहेत तर विद्यार्थ्यांनी त्याचा भरपुर लाभ घ्यावा असे आव्हान केले.
या प्रसंगी व्यास पीठावर प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, प्रा. दुधभाते, ॲनीमेशन विभाग प्रमुख प्रा.दुर्गा शर्मा, प्रा.सचिन पतंगे, प्रा.शेख इरफान, प्रा.संतोष काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. आकांक्षा बारस्क्र, गार्गी रेवडकर, यांनी केले तसेच पाहुण्यांचा परीचय कु.नचीकेत साळुंके यांनी दिला व आभार वैष्णवी बारस्कर या विद्यार्थीनीने मांडले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रमाणात सहभाग नोंदविला.