डान्स अँन्ड फिटनेस स्टुडिओचा भव्य शुभारंभ

डान्स अँन्ड फिटनेस स्टुडिओचा भव्य शुभारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : एन जी नाईक डान्स अँड फिटनेस स्टुडिओचा भव्य शुभारंभ दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, डान्स इंडिया डान्स (पार्ट 6 )मधील बेस्ट डान्सर दीपक हुलसुरे, सिनेअभिनेत्री तनुजा शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. अहमदपूर शहरात प्रथमच डान्स स्टुडिओची सुरुवात झाली असून या उद्घाटन प्रसंगी प्रशांत घाटोळ,अजहर बागवान,अभय मिरकले,प्रा.अनिल चवळे, एन.डी राठोड,नाथराव राठोड,संजय पवार,सिताराम जाधव,लक्ष्मण गोजेगावकर,बाबू राठोड ,माधव जाधव, प्रशांत भोसले,अविनाश धडे,तुकाराम देवकत्ते,बस्वेश्वर थोटे, गंगाधर आडे, हरिश्चंद्र जाधव,आदिच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला.

स्टुडिओचे संचालक नितीन आडे,संगीत शिक्षक मनोज गायकवाड,यांच्या कल्पनेतून शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखले जाणारे अहमदपूर शहरात एक चांगल्या दर्जाचे डान्स स्टुडिओची आवश्यकता आहे.हे ओळखून शहरातील नवतरुण कलावंतासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी शरीर सुदृढ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.निरोगी व सुदृढ शरिरयष्ठीसाठी डान्सच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या रचनेत बदल घडून आणू शकतो.म्हणून वेगवेगळ्या नृत्याचे प्रशिक्षण या एन जी नाईक डान्स स्टुडिओतून दिले जाणार असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.अनिल चवळे तर आभार नितीन आडे यांनी मानले.

About The Author