स्थानिक गुन्हे शाखा पथकाची विशेष कामगिरी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर (कैलास साळुंके) : लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.10 डिसेंबर रोजी गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी कुर्डूवाडी जि. सोलापूर येथे रवाना झाले होते. कुर्डुवाडी येथे जाऊन सदर गुन्ह्यातील आरोपी ची माहिती घेत फिरत असताना शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी जवळ आले असता एका गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम नामे लातूर येथुन चोरून आणलेली काळी रंगाची होंडा एक्टिवा (गाडी क्रमांक एम एच 24 एस 9108) गाडीसह शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी समोरील रोडवर थांबलेला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती वरून शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी समोरील रोडवर काळी रंगाची होंडा एक्टिवा सह थांबलेल्या इसमाला ताब्यात घेतले व सदरील इसमाची विचारपूस केली असता रोहित सुभाष अलगुडे वय 26 रा. वडार वस्ती, खाडगाव रोड, लातूर. (हल्ली मुक्काम भिमनगर, कुर्डूवाडी जि.सोलापूर) असे सांगितले. सदर ऍक्टिवा गाडी संबंधित विचारपूस केली असता ही गाडी दोन महिन्यापूर्वी जुना औसा रोड, लातूर येथून चोरून आणली असल्याचे सांगितले सदरील इसमाची सखोल विचारपूस केली असता मागील काही महिन्यापासून लातूर शहरातून 9 मोटर सायकल व 1 स्कुटी अशा गाड्या चोरून आणल्याचे सांगितले. चोरून आणलेल्या गाड्यांची माहिती विचारली असता त्या गाड्या इसम राहत असलेल्या आशाबाई गव्हाणे यांच्या भिम नगर, कुर्डूवाडी यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले. या एकही गाड्यांचे कागदपत्रे सदरील इसमाकडे नसल्याने चोरीच्या मोटरसायकल एकूण 9 व 1 ॲक्टिवा आणि 1विगो असे एकूण 11 गाड्यासह गुन्ह्यातील आरोपी रोहित सुभाष अलगुडे वय 26 यास भीमनगर, कुर्डूवाडी जि. सोलापूर येथून ताब्यात घेऊन लातूर येथे आणले असून चोरीस गेलेले मोटरसायकली 9 आणि 1 होंडा एक्टिवा व 1 टीव्हीएस वीगो एकूण किंमत 3 लाख 48 हजार रुपयांच्या मुद्देमालासह सदरील आरोपी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत असून सदरची कामगिरीही लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार संजय भोसले, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड यांनी विशेष कामगिरी बजावली असून पोलिस हेड कॉन्स्टेबल फड व पोलिस हेड कॉन्स्टेबल डांगे, चालक निटुरे आदींनी परिश्रम घेतले आहे.
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचे वर्णन खालील प्रमाणे
1). पांढरी रंगाची टीव्हीएस कंपनीची विगो एम एच 24 ए डी 2884
2). काळी लाल रंगाची बजाज कंपनीची पल्सर एम एच 24 बीडी 022
3). लाल रंगाची होंडा कंपनीची शाईन एम एच -24 एस 6844
4). काळी लाल रंगाची बजाज डिस्कवर एम एच 24 टी 8600
5). काळी लाल रंगाची होंडा ड्रीमयोगा
6). काळी रंगाची हिरो होंडा सीडी डॉन एम एच 24 के 6742
7). काळी रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर एम एच 12 एफ इ 2623
8). काळी रंगाची हिरो स्प्लेंडर एम एच 24 बी एच 7176 9). ग्रे रंगाची होंडा शाइन एम एच 44 पी 9245
10). काळी रंगाची हिरो स्प्लेंडर एम एच 14 ए फ्यू 5087