रेणापूर कॉंग्रेसच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती साजरी

रेणापूर कॉंग्रेसच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती साजरी

रेणापूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने दि. 11 डिसेंबर रोजी संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी रेणापूर तालुका कॉंग्रेसचे तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन व्हा.चेअरमन अँड. प्रमोद जाधव, सेवादल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, रेणाचे माजी संचालक विश्वासराव देशमुख, रेणापूर तालुका संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष गोविंद पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, नगरसेवक भुषण पनुरे, पुंडलिक इगे, प्रदिप काळे, रमेश बोने, मनोहर व्यवहारे, उटगे गुरुजी, ज्ञानोबा सातपोते, सोपान सातपोते, किसन शहापुरे, बापु सातपोते, चंद्रकांत माने, सतीश चव्हाण, तानाजी सुर्यवंशी, बाळु पटनुरे, अनंत देवकते यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस , युवक काँग्रेस आणि विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.

About The Author

error: Content is protected !!