अँड.किरण जाधव यांच्या हस्ते संजय गांधी निराधार च्या समाधान शिबिराचा शुभारंभ

अँड.किरण जाधव यांच्या हस्ते संजय गांधी निराधार च्या समाधान शिबिराचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : गोरगरीब व वयोवृध्दांसाठी राज्य शासनाची संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. दि. १२ डिसेंबर रोजी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील संजय गांधी निराधार योजनेच्या समाधान शिबिराचा शुभारंभ काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अँड. किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी लातूर शहर संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष हकीमभाई शेख, विरोधी पक्षनेते अँड. दिपक सुळ, नगरसेविका सौ.कांचन रत्नदीप आजनिकर, सुनील पडिले, दगडू आप्पा मिटकरी, आकाश भगत, बप्पा मार्डीकर, विजय टाकेकर, अजय वाघदरे, श्रीकांत गर्जे, शेख आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!