दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने औद्योगिक सहल
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी मौजे. मळवटी येथील ट्वेंटीवन साखर कारखान्याला सदिच्छा भेट देण्यात आली. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या औद्योगिक विचाराला चालना मिळावी म्हणून महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यातील साखर उत्पादन व इतर उत्पादनांची माहिती जाणून घेतली व संपूर्ण उद्योग प्रक्रिया कशी चालते याविषयी सविस्तर माहिती अवगत केली. ट्वेंटीवन साखर कारखाना हा मराठवाड्यातील एक प्रायोगिक तत्त्वावरील आधुनिक साखर कारखाना असून लातूर तालुक्यातील विस्तीर्ण परिसरामध्ये उभा राहिलेला कारखाना आहे. यामध्ये साखर डिसलरी तसेच उद्योगाला लागणारे इतर कच्चामाल देखील उत्पादित केला जातो, स्वंयचलीत विद्युतवाहिनी तसेचगाळप क्षमता दररोजची जवळपास सहा हजार टन आहे. या कारखान्याला आवश्यक असणारी वीज त्याच ठिकाणी निर्माण केली जाते व अतिरिक्त वीज महावितरणला विकली जाते अशी माहिती या कारखान्यातील कर्मचारी जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी भेट दिली, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या औद्योगिक सहलीचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रा. दिनेश जोशी, प्रा. सुरेश क्षीरसागर डॉ. गोपाल बाहेती, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. विलास कोमटवाड प्रा. शैलजा दामरे यांनी परिश्रम घेतले. सदरील सहलीस विद्यार्थ्याचा उर्त्स्फुत प्रतिसाद होता.