विद्युत टान्सफार्मर चालत नाहीत, मग बील कशासाठी भरायची?
ग्रामीण भागातील शेतकर्यांची गार्हाणी
लातूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यभर शेतकर्यांचे कृषी पंपाची विद्युत तोडणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. महावितरण कडून शेतकर्यांनी थकीत वीज बील भरल्या शिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. असा सज्जड दम दिला जात आहे. पण दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकर्यांमध्ये एकच चर्चा ऐकायला मिळत आहे ती म्हणजे ‘ विद्युत टान्सफार्मर व्यवस्थित चालत नाहीत, विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही. मग बील कसे भरायचे? असा प्रश्न शेतकर्यापुढे उभा आहे.
लातूर तालुक्यातील हरंगुळ सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातील कृषी पंपांना केला जाणारा विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्याच्या बरोबर विद्युत टान्सफार्मर चे फ्युज सतत जाणे, विज जाणे अशा तक्रारी सर्रास शेतकर्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. यासंदर्भात कार्यक्षेत्रातील संबंधित कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी यांना दोन दोन वर्षा पासून वारंवार तक्रारी देऊन ही तक्रारी चे निरसन होत नाही. विद्युत टान्सफार्मर चे फ्युज गेल्यावर नंतर कर्मचार्याशी संपर्क केला की फोन उचलत नाहीत, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशी चर्चा सध्या शेतकर्यामध्ये ऐकायला मिळत आहे. विद्युत टान्सफार्मर चे फ्युज गेल्या नंतर किंवा विज गेल्या नंतर ते घालण्यासाठी पैश्याची मागणी केली जाते. अशी चर्चा सध्या शेतकर्यामध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये बील कसे भरायचे? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. विद्युत बील भरुन अशी परिस्थिती राहिली तर कसे होणार? मग बील भरुन काय उपयोग? या संदर्भात कार्यकारी अभियंता यांना वारंवार तक्रारी देऊण सुध्दा संबंधित अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात! मग शेतकर्यांनी तक्रारी कोणाकडे करायच्या? असा प्रश्न शेतकर्यांना पडलेला आहे.