लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेस बेस्ट क्रेडिट ग्रोथ व बेस्ट टर्नर राऊंड बँक अवार्ड प्रदान

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेस बेस्ट क्रेडिट ग्रोथ व बेस्ट टर्नर राऊंड बँक अवार्ड प्रदान

लातूर बँकेचा देशातील नामांकित को ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रात नावलौकिक

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक क्षेत्राशी निगडित घडामोडींचे विश्लेषण करणारी नामांकित संस्था फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग अवार्ड (fcba) यांच्यावतीने देण्यात येणारे २०२१ चे दोन पुरस्कार राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाले असून त्यात बँकेची एकूण सदृढ आर्थिक परिस्थिती , कर्ज वितरण, वसूली बेस्ट डीपॉझिट, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम सेवा, व्यवहार यासाठी (१) बेस्ट क्रेडिट ग्रोथ अवॉर्ड २०२१ व बेस्ट टर्नर राऊंड बँक अवार्ड २०२१ असे दोन पुरस्कार शनिवारी सायंकाळी गोवा येथे दिमाखदार सोहळ्यात प्रमुख अतिथी राज्य सहकारी बँकेचे माजी कार्यकारी संचालक कर्नाड, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ अतुलबाबा भोसले, आमदार देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हे दोन्ही पुरस्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ बँकेचे सरव्यवस्थपक सी एन उगीले, सरव्यवस्थापक तानाजी जाधव, बँकेचे ऑडिट व्यवस्थापक व्ही सी बिरादार यांनी स्वीकारला आहे राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आजतागायत राष्ट्रीय पातळीवरील व राज्य पातळीवरील तब्बल आतापर्यंत तीस पुरस्कार मिळाले असून उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळवण्यात लातूर बँक राज्यात पहिली ठरली आहे या पुरस्कारामुळे लातूरच्या सहकार चळवळीत मानाचा तुरा रोवला आहे.

यापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देशपातळीवरील अनेक पुरस्कार तसेच राज्य शासनाचा सहकार निष्ठ, असे मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत लातूर बँकेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेवून शेतकरी सभासदांना आधार देत ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देवुन जिल्हा बँकेने कात टाकली आहे ग्रामीण भागातील लोकांना घरपोच गावात जाऊन को अर बँकिंग सेवा देणारी लातूर बँक राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे आजही राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा बँका त सोयी सुविधा अधिक देवुन लोकांना कमी वेळेत ग्राहक, कर्जदारांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी लातूर बँक राज्यात नव्हे देशात पहील्या स्थानावर आहे बँकेने पहिल्यांदा पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून शेतकरी सभासदांना आधार देण्याचे काम या बँकेने केले आहे त्यामूळे निव्वळ नफा कमावणे इतकं काम न करता सामाजिक बांधिलकी जपत लोकांना आधार देण्याचे काम सातत्याने केले जात आहे हे आवर्जून बँकेचा आलेख चढता राहिलेला आहे मागच्या २० वर्षात ऑडिट वर्ग अ दर्जा असून वसूली प्रमाण ९९ टक्के पेक्षा जास्त राहिलेले आहे.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख यांच्या कडून अभिनंदन

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक, कोअर बँकिंग, अत्याधुनिक उत्कृष्ट सेवा याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील २ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हाइस चेअरमन अँड.प्रमोद जाधव यांनी जिल्हा बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करून या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author