दयानंद कला महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर

दयानंद कला महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्या शासनाने मान्य करावे म्हणून मागील दोन वर्षापासून शासनाकडे सतत लेखी पाठपुरावा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने करुनही अद्यापपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यामुळे दि. 14 ते 19 डिसेंबर 2021पर्यंत काळया फिती लावुन अंदोलन करणार आहेत. आंदोलनादरम्यान शासनाने सकारात्मक निर्णय नाही घेतल्यास आम्ही सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी दि. 20 डिसेंबर 2021 पासून बेमुदत कामबंद आंदोलन (संप) करणार आहेत. सदरील आंदोलन हे लोकशाही मार्गाने राज्य व विभागीय महासंघाच्या मार्गदर्शनाने करणार आहोत. या आंदोलनात कोविड-19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. असे दयानंद कला महाविद्यालयातील शिक्षकेत्तर युनिट प्रमुख बालकिशन अडसूळ, सचिव विक्रमसिंग ठाकूर , अधीक्षक नवनाथ भालेराव, शिवाजी पाचांळ, राजू राठोड, श्रीकांत जोशी, विकास खोगरे, वशिष्ठ कुलकर्णी, रामकिशन शिंदे, श्रीमती ए.एस. सुरवसे, श्रीमती दहिरे एन.आर., रघुराम टोंपे, दिलीप गिरबने, माधव गायकवाड, श्रीमती चंद्रकला आदमाने, प्रमोद मुगळे आदी कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

About The Author