बाजार समितीच्या 15 संचालकांवर गैर व्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल
सभापती, उपसभापती सह दोन सचिवांवर गुन्हा दाखल
औराद शहा (भगवान जाधव) : औराद शहाजणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती सह दोन सचिवांसह तेरा संचालकांवर गौर व्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी कमाल बहादुर पटेल (लेखापरीक्षक श्रेणी-२ सहकारी संस्था यांचे फिर्यादीवरून काल दि. १५ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे आरोपींचे नावे आहेत.
१) तत्कालीन सभापती प्रदीपकुमार बाबाराव पाटील रा. सावरी ता. निलंगा (मयत),
२) तत्कालीन उपसभापती लक्ष्मण नामदेवराव आकडे रा. माकणी ता. निलंगा,
३) तत्कालीन सचीव राजेंद्र रावसाहेब ताभांळे रा. ताडमुगळी ता. निलंगा (मयत)
४) तत्कालीन संचालक ओमप्रकाश लक्ष्मणराव बिराजदार रा. मीरगनहल्ली ता. निलंगा
५) तत्कालीन संचालक सौ. मुमताज बरकत पठाण रा. बोरसुरी ता. निलंगा
६) तत्कालीन संचालक सौ. सुमनबाई अण्णाराव बिराजदार रा. बसपुर ता. निलंगा
७) तत्कालीन संचालक रविद्र शिवाजी गायकवाड रा. औराद शहाजानी ता. निलंगा
८ ) तत्कालीन संचालक सुधाकर श्रीनिवास शेटगार रा. औराद शहाजानी
९ ) तत्कालीन संचीव रमेश नरसिंग तेलंग रा. औराद शहाजानी
१०) तत्कालीन संचालक हल्लाप्पा विरसंगप्पा कोकणे रा. बालकुंदा ता. निलंगा
११) तत्कालीन संचालक सुभाष अण्णाराव डावरगावे रा. तगरखेडा ता. निलंगा
१२) तत्कालीन संचालक नुरअहेमद लालअहमद पटेल रा. औराद शहाजानी, ता.निलंगा
१३) तत्कालीन संचालक मैनोद्दीन मन्सुर मोमीन रा. कलमुगळी , ता. निलंगा
१४) तत्कालीन संचालक वामन गोपाळराव तांभाळे रा. ताडमुगळी , ता. निलंगा
१५) बालाजी मधुकर म्हेत्रे रा.ताडमुगळी या संचालकांनी अपहार केल्याची तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सभापती, उपसभापती व दोन सचिव आणि संचालकांनी मागील दिनांक ०१/०४/२०१४ ते ३१/०३/२०२१ या कालावधीत अपहार केलेली आहे. त्याची रक्कम ३८,२७,५८२/- रोख रक्कम यातील नमुद आरोपीतांनी संगणमंत करुन एकुण ३८,२७,५८२/- रुपयेचा अपहार केला व त्यापैकी काही संचालकांनी रुपये ४,४०,०००/-रुपयेचा भरणा केला आहे. उर्वरीत रुपये ३३,८७,५८२/- चा अपहार करुन कृषी उत्पन्न बाजार समीती औराद शहाजानी यांची फसवणुक केली नुसार जबाब दिले वरुन स.पो.नि. संदीप कामत यांचे आदेशाने गु.र.नंबर २२५/२१ भा.दं.सं.नुसार कलम ४२०,४०९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास स.पो.नि. संदीप कामत हे स्वत: करीत आहेत.