कायद्याच्या साक्षरतेतून महिला सक्षम होतील – अ‍ॅड.रुक्मिणी सोनकांबळे

कायद्याच्या साक्षरतेतून महिला सक्षम होतील - अ‍ॅड.रुक्मिणी सोनकांबळे

उदगीर (प्रतिनिधी) : महिला अत्याचार निवारणार्थ वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. मात्र या कायद्याचा अभ्यास, माहिती बऱ्याच महिलांना नसते. त्यामुळे त्या आपल्या हक्कापासूनही वंचित राहतात. कायद्याची साक्षरता ही महिलांना सक्षम आणि कणखर बनवेल. असा विश्वास विधिज्ञ रुक्मिणी सोनकांबळे यांनी व्यक्त केला. त्या उदगीर येथील इनरव्हील क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. इनरव्हील क्लबच्या वतीने सतत महिला सक्षमीकरण यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर येथील मातृभूमी महाविद्यालयात हुंडाविरोधी कायदा यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 याप्रसंगी अ‍ॅड.रुक्मिणी सोनकांबळे, एडवोकेट वर्षा कांबळे, एडवोकेट वर्षा बनसोडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, सचिव सौ शिल्पा बंडे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ उषा कुलकर्णी उस्तुरे, सौ. निलिमा पारसेवार इत्यादी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 याप्रसंगी पुढे बोलतांना विधिज्ञ रुक्मिणी सोनकांबळे म्हणाल्या की, महिलांनी कायद्याचे ज्ञान मिळवून घ्यावे, तसेच समाज माध्यमांचा वापर करत असताना अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सांगितले.

 या कार्यक्रमासाठी सौ स्वाती गुरुडे, मानसी चन्नावार,  स्नेहा चणगे, सौ. स्वाती जेटूरे, सौ. जयश्री गुरमे, डॉ प्रियंका राठोड, रेखा रणक्षेत्रे, उषा साताळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ अश्विनी देशमुख यांनी केले.

About The Author