महात्मा फुले महाविद्यालयास अंतर महाविद्यालयीन तलवारबाजीत दोन रौप्य पदक

महात्मा फुले महाविद्यालयास अंतर महाविद्यालयीन तलवारबाजीत दोन रौप्य पदक

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘अ’ आणि ‘ब’ झोन मध्ये तलवारबाजी या क्रीडा प्रकारात दोन रौप्य पदक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. १४ डिसेंबर २०२१रोजी परभणी येथील कमलताई जामकर महिला महाविद्यालयात झालेल्या तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत ‘ब’ झोन मध्ये दोन रौप्यपदक प्राप्त केले असून या क्रीडास्पर्धेत कु. मनिषा सुरनर सेबर मध्ये रौप्य तर यशपाल बनसोडे ने फॉईल तलवारबाजी प्रकारात रौप्य पदक प्राप्त करून क्रीडा क्षेत्रात विद्यापीठ पातळीवर फुले महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला आहे. या खेळाडूनां क्रीडा संचालक प्रो. डॉ.अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व यशस्वी खेळाडूंचा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील अंतरविद्यापीठ स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतिश ससाने , डॉ.पांडुरंग चिलगर, प्रशांत डोंगळीकर उपस्थित होते. तसेच या यशाबद्दल सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी , कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!