अहमदपूर येथील बँकातील सर्व कर्मचारी व अधिकारी दोन दिवस देशव्यापी संपावर
अहमदपूर (गोविंद काळे) : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालकीच्या बँकातील सर्व कर्मचारी अधिकारी दिनांक 16 व 17 डिसेंबर 2021 या दोन दिवशी देशव्यापी संपावर आहेत देशभरातील बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प होणार असल्याने बँक ग्राहकांची गैरसोय होणार आहे म्हणूनच सर्वप्रथम आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. कर्मचारी संघटनांनी संपाचे हे निर्वाणीचे हत्यार उगारले आहे संसदेच्या चालू अधिवेशनात केंद्र सरकार ब्रेकिंग रेगुलेशन ॲक्ट 1970 ते 1980 या कायद्यात दुरुस्ती करून सरकारच्या मालकीच्या असलेल्या बँकांचे खासगीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. बँक ग्राहक ठेवीदार धारक अर्थतज्ञ अन्य राजकीय पक्ष या कोणालाही विश्वासात न घेता त्यांचा विरोध डावलून सरकार देशहित विरोधी निर्णय घेत आहे. खाजगीकरण म्हणजे सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची समाप्ती जनधन योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, पिक विमा, निराधार पेन्शन या आणि अशा अनेक योजना खाजगी बँका राबवत नाहीत कारण त्याच्यासाठी सामाजिक नफ्यापेक्षा व्यवहारिक नफा महत्त्वाचा आहे. सर्व देशवासियांना समान आर्थिक संधी देणाऱ्या भारतीय राज्यघटनेत समाविष्ट मार्गदर्शित तत्त्वाचे हे विरोधी असणार आहे म्हणून बँकेतील सर्व कर्मचारी अधिकारी दोन दिवशी देशव्यापी संपावर आहेत.
बॅंक खाजगीकरण विरोधी संप बँक कर्मचार्यांचा संप अहमदपुर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र शाखे समोर युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स च्या वतीने बँक बचाव देश बचाव सर्व जनतेला माहिती चे परिपत्र देऊन दि 16-12-2021 रोजी संप करण्यात आला बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी, अमित शेळके, रामेश्वर परिट, शिवाजी कोळी, वालमिक कज्जेवाड, धर्मेश बनसोडे, अश्विनी गुरमे, कृष्णा नखाते व्यंकट भोगे, सतिश बनसोडे, सुभाष काळबोने, दिलीप वाघमारे, एसबीआई बँक दत्तात्रेय मोटे, अमोल खरशे,सगर यांनी संपात सहभागी झाले.