अहमदपूर येथे महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांचा सत्कार

अहमदपूर येथे महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) येथे महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे साहेब यांना मदत सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती शिवानंद तात्या हेंगणे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांबअप्पा महाजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, समाजकल्याण चे माजी सभापती अॅड. टी.एन. कांबळे, उत्तमराव माने , दादासाहेब पवार गुरुजी, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, डॉ.किनगावकर, एलआयसीचे विकास अधिकारी कादरी साहेब, आर.जी. कांबळे सर, बनसोडे, महेंद्र कांबळे, तानाजी राजे, रहिमखान पठाण, बाबुभाई रुईकर, गोपीनाथ जोंधळे, हुसेनभाई मणियार, जावेद बागवान, पत्रकार प्रा. रत्नाकर नळेगावकर, पत्रकार दिनकर मद्देवाड, पत्रकार मेघराज गायकवाड, प्रकाश ससाणे, इलाही बागवान, नगरसेवक फुजैल जहागीरदार, किरण बारमाळे, अहमद तांबोळी, आशिष तोगरे, चंद्रशेखर भालेराव, एन.डी. राठोड, आशोकराव सोनकांबळे, संभाजी चोपणे, नाजीमभाई शेख, बालाजी कांबळे, नारायण हिवरे, छोटू हिवरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!