दत्त जयंती उत्साहात साजरी
औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील दत्त आश्रमात दत्त जयंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने परम पूज्य सौ महानंदा माता यांच्या अनुष्ठान सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण, श्रीमद भागवत कथा, नवचेतना शिबीर, दत्त स्वाहाकार महायज्ञ आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्रीमद भागवत कथेसाठी अवधूत दत्तात्रेय महाराज, भागवत कथा साथ संगीत शुभांगी दीदी उजनी, नवचेतना शिबिरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे आनंद महाराज, कीर्तन सेवेसाठी बालकीर्तनकार चैतन्य महाराज, भजन संध्येसाठी आतंरराष्ट्रीय गायक ब्रजरसिक मधुकर महाराज, यांची उपस्थिती लाभली.
दि.19 डिसेंबर रोजी भरत महाराज थोरात यांच्या काल्याच्या किर्तनानंतर श्री ची आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक अवधूत दत्तात्रेय महाराज, गणेश महाराज , आनंद महाराज, कृष्णा महाराज कदम, सीताराम यादव, वसंत पाटील, अतुल कोरेकर, महेश पाटील, गणेश कोरेकर, महेश यादव, जितेंद्र कुलकर्णी, जगदीश पाटील, वसंत शिर्के, बाबा यादव, विजूबापू निकम, नितीन मुळे, संभाजी बोरुळे, सुनील घोरपडे, संतोष जाधव, तानाजी यादव, पत्रकार प्रशांत नेटके यांच्यासह दत्तगुरु सेवा मंडळ आणि वारकरी सेवा फाऊंडेशनचे सर्व कार्यसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.