जागृती शुगर च्या २ लाख ९१ हजार ०१ साखर पोतेचे पूजन

जागृती शुगर च्या २ लाख ९१ हजार ०१ साखर पोतेचे पूजन

जयवंत शुगरचे चेअरमन विनय बाबा भोसले, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात खाजगी साखर कारखानदारीत सर्वाधिक एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणारा देवणी तालुक्यांतील तळेगांव येथील जागृती शुगर अँड अलाईं ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने सन २०२१ -२२ चालू हंगामातील गाळप झालेल्या उत्पादित २ लाख ९१ हजार ०१ साखर पोत्याचे पूजन शुक्रवारी कराड येथील जयवंत शुगर चे चेअरमन विनय बाबा भोसले यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जयवंत शुगर चे प्रेसिडेंट सी एन देशपांडे, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील माजी आमदार अँड त्रिंबक भिसे,रेणा चे चेअरमन सर्जेराव मोरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले या हंगामात आजतागायत १ लाख ४७ हजार २० मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे जागृती शुगर च्या चेअरमन सौ गौरवीताई अतुल बाबा भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती शुगर कारखान्याने नऊ गळीत हंगाम यशस्वीपणे उसाचे गाळप केले आहेत यावर्षीचा गाळप हंगाम यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जागृती शुगर इंडस्ट्रीज ने कमी वेळात चांगला कारखाना उभा केला – विनय बाबा भोसले

यावेळी बोलताना जयवंत शुगर चे चेअरमन विनय बाबा भोसले म्हणाले की खाजगी तत्वावर साखर कारखाना उभा करून कमी कालावधीत जागृती शुगर ने अधिक गाळप करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांट उभा केला असून उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देवुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल जागृती शुगर चे कौतुक करून आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यात नवीन काही करता येईल का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू या परिसरात कारखान्याला मोठी जागा असल्याने सुटसुटीत कार्यालय प्रशासकीय इमारत, गार्डन आदी सुविधा देण्याचा प्रयत्न झाल्याने हे शेतकऱ्यांसाठी मंदिर असल्याचे वाटते असेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी मान्यवरांनी कारखाना परिसरातील लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून पुष्पहार अर्पण त्यांना अभिवादन केले.

यावेळी जागृती शुगर चे प्रकल्प व्यवस्थापक सुनील कुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमास रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, माध्यम समन्वयक हारिराम कुलकर्णी, जयवंत शुगरचे डेप्युटी जनरल मॅनेजर आर आर इजाते, इंनस्टूमेंट मॅनेजर अरुण खटके डेप्युटी चीप केमिस्ट चव्हान के भाऊसाहेब , जागृती शुगर चे खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About The Author