मासिक वेतनासाठी शिक्षकांना आर्थिक मागणी करू नये – शिक्षणाधिकारी प्राथमिक

मासिक वेतनासाठी शिक्षकांना आर्थिक मागणी करू नये - शिक्षणाधिकारी प्राथमिक

मुख्याध्यापकांच्या मनमानीला लगाम; महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काॅंग्रेस च्या मागणीला यश!

लातूर (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या दरमहाच्या मासिक वेतनासाठी आॅनलाईन बिले काढावी लागतात. आॅनलाईनसाठी येणारा खर्च म्हणून जिल्हाभरातील कांहीं मुख्याध्यापक मनमानी पद्धतीने पैसे आकारून शिक्षकांची आर्थिक लूट करीत होते. ही बाब कांहीं जाणकार, अभ्यासू शिक्षकांनी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काॅंग्रेस चे जिल्हाध्यक्ष केशवभैय्या गंभीरे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षकांचे मासिक वेतन काढण्यासाठी दरमहा मुख्याध्यापकांना पैसे द्यावे लागतात हा मुद्दा महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काॅंग्रेस संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष गंभीरे यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित केलेल्या शिक्षक दरबारामध्ये लिखीत स्वरूपात मांडला व यावर तातडीने पायबंद घालण्याची मागणी केली.त्यासमयी आमदार महोदयांनी संबंधितांना याबाबत लवकर निर्णय घेण्याची सूचना करून देखील आवश्यक पत्रादेश न निघाल्याने पुनश्च महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या माध्यमातून लिखीत आठवण करून देण्यात आल्यानंतर या न्याय्य मागणीचा सकारात्मक विचार करून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी जिल्हा परिषद प्रशाला मुख्याध्यापक व लातूर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक ११जानेवारी २०२२रोजी पत्रादेश काढून शिक्षकांचे मासिक वेतन देयक तयार करण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी न करण्याचे सूचित केले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष केशवभैय्या गंभीरे, सुरेश सुडे, बालाजी सर्जे, ज्ञनजीऊल्ला शेख, अंगद सावंत, प्रकाश जाधव यांनी स्वागत केले आहे व प्रशासनाचे आभार मानले आहे.

About The Author