जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांच्या विचारावर यशस्वी वाटचाल केल्यास भारत जगाचे नेतृत्व करेल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : शिक्षण, विचार व संस्कारातून देश घडविण्याचे काम सुरू केलेले आहे. राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदानी 18 व्या शतकामध्ये अमेरिकेमधील शिकागो येथील धर्मपरिषदेत भारत देशाची मूळ संस्कृती, समर्पित भाव, मानवतावाद, परोपकार, अध्यात्मवाद यावर आत्मविश्वासाने मांडणी केली. त्यामुळे भारताची प्रतिमा जगभरात चांगली निर्माण झाली. तसेच स्वराज्य निर्मिती व विचाराला झळाळी देण्याचे काम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी केले. त्याच विचारावर वाटचाल केल्यास 21 व्या शतकामध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल ही विवेकानंदाची भविष्यवाणी खरी ठरेल. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, पतंजलिचे योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णूजी भूतडा, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, जे.एस.पी.एम.चे समन्वयक संचालक निळकंठरावा पवार, जे.एस.पी.एम.चे समन्वयक संभाजीराव पाटील रावणगावकर, समन्वयक विनोद जाधव, आप्पासाहेब पाटील, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, विश्वजीत पाटील कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.