Police Flash News

सद्भावना मंचच्या वतीने पाणी वाचवा या विषयावर बैठक

0
25
सद्भावना  मंचच्या वतीने  पाणी वाचवा या विषयावर बैठक

उदगीर (एल पी उगिले) येथील सदभावना मंच तर्फे शहरातील पाणी समस्या बाबत विचार करण्याकरिता बैठक घेण्यात आली. त्यात पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता काही कार्यक्रम आखण्यात आले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याशी भेट घेण्यात येईल. त्याचबरोबर जनजागृती व्हावी, म्हणून शहरातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसमोर पाण्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.पत्रक काढून पाण्याच्या काटकसरी बाबतचा संदेश घरोघरी पोहोचवला जाईल असे ठरले. ही बैठक विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

याप्रसंगी सुप्रसिद्ध कलाकार दिवंगत नाना पाटेकर यांना मंचतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सद्भावना मंच उदगीरचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील,सचिव डॉ. शेख असगर, उपाध्यक्ष विश्वनाथ बिरादार, बाबुराव माशाळकर , प्रो.डॉ.बलीराम भुकतरे , विश्वनाथ मुडपे गुरुजी, शेख़ इसहाक़, हाश्मी सय्यद , हकीम शेख,मुजीब देवणीकर इ. मान्यवर उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌