Police Flash News

होणाळी येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर देवणी पोलिसांचा छापा; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
29
होणाळी येथे तिर्रट जुगार अड्ड्यावर देवणी पोलिसांचा छापा; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच देवणी पोलिसांनी मौजे होणाळी येथे सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चार मोटारसायकली, रोख रक्कम, पत्ते व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे होणाळी येथे महैम्मुद मैनोदिन पटेल यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली काही व्यक्ती तिर्रट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत व्यंकट आलुरे, भरत सूर्यवंशी, अजित श्रीमंत जाणतीकर, गोविंदराव बिरादार आणि रामराव गिरी या होणाळी येथील पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून चार मोटारसायकली, रोख रक्कम, पत्ते व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल व्यंकटराव वडारे यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) नुसार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गुणाले (बक्कल क्रमांक १५८१) करीत आहेत.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार

देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगारासह इतर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच परिसरात अवैध जुगार किंवा अन्य बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवणी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌