ढगेज् इंग्लिश अकॅडमी मध्ये पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : ढगेज् इंग्लिश अकॅडमी येथे शैक्षणिक वर्षे 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये गुणवत्ताधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे प्रमुख श्री व्यंकटराव ढगे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून परिमल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव श्री बाबुराव जाधव सर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र तथा नरहरी मॅथ्स क्लासेसचे संचालक श्री सतीश नरहरे सर, तसेच पत्रकार शशिकांत पाटील, श्री भोसले. पालक प्रतिनिधी श्री मैंदाड सर , नगरसेविका सौ कुलकर्णी मॅडम ,आदी मान्यवर उपस्थित होते. या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सचिदानंद ढगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून घेण्यात आलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली तसेच या अकॅडमीने आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवले आहेत. व येथून बाहेर पडलेले विद्यार्थी आज महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर देशाबाहेरही विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले तसेच ढगेज् इंग्लिश अकॅडमीतील विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठीच श्री सचिदानंद ढगे व विवेकानंद ढगे या दोघांनीही पूर्ण वेळ देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एकच आमचा ध्यास या संकल्पनेनुसार वाटचाल करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी श्री सतीश नरहरे सर यांनीही अकॅडमीच्या माध्यमातून जे काम चालू आहे ते निश्चितच लातूरच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय अशा स्वरूपाचे कार्य असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परिमल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री बाबुराव जाधव यांनीही ही इंग्लिश अकॅडमी संस्कारशील विद्यार्थी घडवणारी अकॅडमी असल्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे श्री शशिकांत पाटील यांनीही या इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात आयपीएस अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे या इंग्लिश अकॅडमीचा मागच्या वर्षी इंग्रजी विषयात शंभर पैकी 100 पैकी 99 घेणाऱ्या वीरेश मैंदाड या विद्यार्थ्यांनेही या अकॅडमीमुळे मी कसे यश मिळवू शकलो हे उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितले. त्याचप्रमाणे याच अकॅडमीचा माजी विद्यार्थी कोटलवार आज स्विझरलँड मध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी करत असल्याबद्दल त्याचाही सन्मान सदरील कार्यक्रमात करण्यात आला. सदरील कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी व दहावी मध्ये टॉपर ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्याच प्रमाणे यावेळी पालकांनीही या अकॅडमीच्या माध्यमातून आमचा पाल्य अत्यंत चांगली व समाधानकारकरीत्या प्रगती करत असल्याची भावना व्यक्त केली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री संभाजी नवघरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विवेक ढगे सर यांनी मानले
