नांदगाव केंद्राच्या प्रभारीपदी नजीऊल्ला शेख
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव चे मुख्याध्यापक सोनाजी भंडारे हे सेवानिवृत्त झाल्यामूळे केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार उपक्रमशिल शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे.शेख यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय,भरीव कार्य आहे.शाळाबाह्य बालकांचा शोध घेवून अनेक बालकांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवले आहे.
बालकांच्या केसस्टडीच्या माध्यमातून राज्यस्तरावरील अनेक चर्चासत्रात त्यांनी तळागाळातील ग्रामिण व शहरी भागातील बालकांच्या समस्यांचे वास्तव चित्र मांडले आहे. बालरक्षकाबरोबरच महाराष्ट्र अंनिस या चळवळीत ते सक्रीय कार्यरत आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांवर योग्य सुसंस्कारा बरोबरच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, राष्ट्रप्रेम जागृत व्हावे,सेवाभाव वाढीस लागावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करुन त्यात मुलांना सक्रिय ठेवतात.
त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात मुख्याध्यापक पदाचा पदभार दिल्याने केंद्रीय शाळा नांदगाव व केंद्रांतर्गत शाळा आणि प्रशासन आदींसोबत कार्य करताना सहाजिकच त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.त्यांच्या या निवडीबद्दल लातूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सन्मान केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी धनराज गिते, केंद्रप्रमुख बालाजी कोळी, श्रावण भोई, नानासाहेब जाधव, महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काॅंग्रेस चे जिल्हाध्यक्ष केशवभैय्या गंभीरे, जिल्हा सोसायटी चे अध्यक्ष हिरालाल पाटिल, राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष आप्पाराव शिंदे, माजी मुख्याध्यापक सोनाजी भंडारे, डायटचे विषय तज्ञ डॉ.योगेश सुरवसे, संतोष ठाकूर, सतिश सातपुते, बीआरसी लातूरचे किशोर शिंदे, शिवराज सोदले, नवल पाटील आदींसह नांदगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षक, शिक्षीका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
