जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानदीपच्या मुलींनी केली 23 किमी रणींग

जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानदीपच्या मुलींनी केली 23 किमी रणींग

अहमदपूर (गोविंद काळे) : “स्पर्श ” द एम्पाथेटीक टच सेवा भावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र अहमदपूर यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींची लॉंग रणिग आयोजित करण्यात आली होती. त्यात अकॅडमी च्या सर्व मुलींनी सहभाग घेतला व तब्बल 23 किमी अंतर केवळ 2 तास 36 मिनिट मध्ये पुर्ण केले. आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने महीला दीन साजरा केला. केवळ बोलून न दाखवता करुन पण दाखवले आणि आम्ही स्वतःचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. असे दाखवून दिले. अकॅडमी चे स्वप्न आहे की ग्रामीण भागातील मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, मुलांसारखी हार्ड फिजिकल ट्रेनिंग केली पाहिजे आणि स्वताच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत.

About The Author

error: Content is protected !!