यशाला शॉर्ट कट नाही – डॉ सुनीता शिंदे
अहमदपूर (गोविंद काळे) : स्पर्श द इम्फाताटिक टच सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र, अहमदपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि अकॅडमी च्या संचालिका सौं. दैवशाला इप्पर होत्या. तर प्रमुख वक्त्या डॉ. सुनीता शिंदे मॅडम होत्या. विध्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्व सांगून मुलींची काय जिम्मेदारी आहे व मुलांची काय जिम्मेदारी आहे हे सांगितलं. तुम्ही जर स्पर्धा करायचीच ठरवली आहे तर मग स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनती मध्ये सातत्य ठेवा, यशाला शॉट कट नसतो असे सांगितले. अकॅडमी मध्ये ढोल ताशाच्या गजरात व लेझीम खेळत उत्सहात मुलींनी हा आनंदाचा दिवस साजरा केला. एक दिवस अगोदर मुलींनी 23 किमी रनिंग करुन दाखवून दिले कि आम्ही पण मुलांपेक्षा कमी नाहीत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांची कांबळे मॅडम व साक्षी ताटे तर आभार अर्चना करपे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी नितीन गुट्टे, राम मेजर, जितेंद्र मेजर, उमाकांत कदम यांनी केले.