रेणापूर तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – खा धैर्यशील माने
रेणापूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यात विकासाच्या दृष्टिकोनातून मोठी संधी आहे.त्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन असणारे युवा नेते हवे आहेत.तालुक्यातील जनतेने युवकांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी.विकास काय असतो हे शिवसेना दाखवून देइल.तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन खा.धैर्यशील माने यांनी केले. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यासाठी खा.धैर्यशील माने यांच्या नेतृत्वात जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांच्यासह १० संपर्क पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.या अभियानात शिवसेना पक्षसंघटना बांधणी,जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण आढावा,शासनाच्या योजना पोचवण्यासह शिवसैनिक व जनतेच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या अभियानाचा समारोप लातूर ग्रामीण मतदारसंघात रेणापूर तालुक्यातील मोटेगाव येथे मेळावा घेऊन करण्यात आला.या मेळाव्याचे आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले होते. या मेळाव्यात खा.धैर्यशील माने यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणामध्ये शिवसेना सामान्य जनतेसाठी सदैव कार्य करीत राहील व जनतेने शिवसेनेला पाठिंबा द्यावा,शिवसैनिकांच्या पाठीशी ताकद उभी करावी असे आवाहन केले.आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या युवकांच्या पाठीमागे जनतेने ठामपणे उभे रहावे.शिवसेनेची भगवी पताका गावागावात पोचवण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे,असेही ते म्हणाले. या मेळाव्यात शिवसेना मोटेगाव शाखेचे उदघाटन करण्यात आले.शिवसेना योजना आपल्या दरी अभियानांतर्गत तयार केलेल्या १५०० मोफत इ श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.रेणापूर तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभही खा.माने यांच्या हस्ते करण्यात आला.शिवजयंती निमित्त कामखेडा येथे घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सचिन दाने या तरुणाच्या पाठीमागे रेणापूर तालुक्यातील जनतेने ताकद उभी करावी, आम्ही विकासाची कामे ताकदीने करू असा विश्वास दिला.आत्तापर्यंत शिवसंपर्क अभियानात झालेल्या सर्व कार्यक्रमांपैकी मोटेगावचा कार्यक्रम हा सर्वोत्कृष्ट आणि चांगला झाला असेही ते म्हणाले.तळागाळात, गोरगरिबांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाव्या, लोकांच्या अडचणी सोडवाव्यात,अन्यायाविरुद्ध लढावे, समाजसेवा करावी. लोकांना आधार वाटेल असे काम करावे असे त्यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद कामखेडा व पोहरेगाव गटातील जनतेची गर्दी होती.फटाक्यांच्या आतषबाजी ने मान्यवरांचे स्वागत केले गेले. मोटेगाव गावकरी व शिवसेना मोटेगाव शाखेच्या वतीने धैर्यशील माने व संजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला.भक्ती-शक्ती मूर्ती भेट देण्यात आली. सचिन दाने यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू. घराघरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे कार्य करीत राहु.येणाऱ्या काळात संपूर्ण रेणापूर तालुका भगवा करून टाकू असे आश्वासन दिले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेश दिला तर रेणापूर तालुक्यातील सर्व गटात जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवू असेही म्हणाले.गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक असा संकल्प करण्यात आला.तालुक्यातील युवकांनी आपल्या गावासाठी, जनतेसाठी सदैव तत्पर राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.शिवसेना जातीपतीला थारा देत नाही.शिवछत्रपतींचा विचार तालुक्यातील सर्व जातींना सोबत घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवू.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रेणापूर तालुक्यात आणून विकास आराखडा बनवून कामे करू असा शब्द खा. धैर्यशील माने यांनी दिला. येणाऱ्या गुडीपाडव्याला भगवी पताका लावून सण साजरा करावा. शिवसेनेच्या विजयाची गुढी उभारण्यासाठी शिवसैनिकांनी कष्ट घ्यावेत असेही ते म्हणाले. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभाताई बेंजरगे,युवासेना जिल्हाप्रमुख राहुल मातोळकर,कुलदीप सूर्यवंशी, सतिश देशमुख,रोहित गोमदे पाटील,विकास जाधव यांची उपस्थिती होती. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वात शिवसेना मोटेगाव शाखेचे शिवसैनिक, विकास पवार,भगवान शिंदे, उत्तम झुंजारे, हनुमंत पाटील, गोविंद सोमवंशी, गोपाळ पवार,मलिकार्जुनाप्पा हलकांचे, बापूराव सोमवंशी, अशोक सोळुंके, ज्ञानेश्वर सोळुंके, माऊली सोळुंके, दशरथ सोळुंके, पाशाभाई शेख, चैतन्य होळकर, नितीन औसेकर,आकाश बोडके, कृष्णा साखरे, बालाजी कस्पटे,मुन्ना अकनगिरे, बापूराव सोमवंशी, मधु डोंगरे, बाबुराव सोमवंशी,शिवा सोमवंशी, तुकाराम जोगदंड,खय्युम शेख,कृष्णा साखरे,माऊली सोळुंके,राजाभाऊ पवार यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
