हाडोळती येथे शिवसंपर्क अभियान संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हाडोळती येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली शिवसेना शिव संपर्क अभियान संपुर्ण लातुर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार, असे प्रतिपादन शिवसेना उपविभाग प्रमुख जोगेश्वरी ( पुर्व) कैलासभाई पाठक यांनी केले. येथील सर्व शिवसैनिकांना संदेश देताना ते बोलत होते.
महाराष्ट्रात मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करत शिवसेनेने मराठी मातीतील माणसाला एकत्र करण्यासाठी शिवसंपर्क अभियान दि.22/03/2022 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केले आहे. शिवसैनिकांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन कैलासभाई पाठक यांनी हाडोळती येथे बैठकीत बोलताना केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी महाराष्ट्र सरकार करत आहे, बेरोजगारांसाठी नवीन नोकरभरती, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी अथक परिश्रम करून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ न देता ज्ञान पोहोचण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आरोग्य योजनेद्वारे आरोग्याचे प्रश्न सोडवणे, तसेच सर्वसामान्य माणसांना चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध प्रकारे मदत सरकार करत आहे. या सर्व योजनांची आणि कामांची माहिती सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी उपस्थित अहमदपूर चाकुर विधानसभा संघटक तथा प समिती सदस्य विलास पवार, शिवसेना तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, संतोष रोडगे, पदमाकर पेंढारकर, दत्ता हेंगणे (विभाग प्रमूख तथा ग्रा.प.सदस्य हडोळती) कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपतालुका प्रमुख अनिल लामतुरे, संजय बुरुसपटे, जितेंद्र पवार शाखाप्रमूख हडोळती, विठ्ठल भोगे, अशोक लोंढे, अमर पवार, अजय गौजेवाड, अजय पवार, सतिश हेंगणे, अमोल पवार, अंबादास नायने, भास्कर पवार, आकाश नायने, रोहीत पवार, संतोष घूमाडे, संतोष वडवळे आदी उपस्थित होते.